Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनमाड-सिकंदराबादसाठी विशेष रेल्वे

मनमाड-सिकंदराबादसाठी विशेष रेल्वे

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वेने मनमाड-सिकंदराबाद, मुंबई-सिकंदराबाद आणि नांदेड-मुंबई दरम्यान विशेष गाडी सुरु केली आहे.

- Advertisement -

मनमाड-सिंकदराबाद विशेष गाडी (07063 डाउन) ही 2 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पुढील आदेशापर्यंत ही गाडी मनमाडहून 20.50 वाजता रवाना होईल.

अप सिकंदराबाद-मनमाड (07064)गाडी 1 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. नागरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, उमरी, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, वाडियाराम, मेदचल, बोलाराम येथे ती थांबेल.

नांदेड-मुंबई अप गाडी (07611) 3 डिसेंबरपासून नांदेडहून पासून 22 वाजता सुटेल. मनमाड व नाशिकरोडला ती थांबेल. डाऊन मुंबई- नांदेड (07612)गाडी 4 डिसेंबरपासून मुंबईहून 18.45 वाजता सुटेल. सिंकदराबाद-मुंबई (07058) गाडी 5 डिसेंबरपासून सिकंदराबादहून 13.25 वाजता रवाना होईल.

मनमाड, नाशिकरोडला ती थांबेल. 07057 डाऊन मुंबई-सिकंदराबाद विशेष गाडी 6 डिसेंबरपासून निघेल. कन्फर्म तिकीट असणार्‍यांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या