Friday, May 3, 2024
Homeनगरभारतीय किसान सभा व ‘स्वाभीमानी’चा नेवासाफाटा येथे रास्तारोको

भारतीय किसान सभा व ‘स्वाभीमानी’चा नेवासाफाटा येथे रास्तारोको

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

केंद्र सरकारने नवीन केलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी

- Advertisement -

कॉ.बाबा आरगडे यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवार दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेवासा फाटा येथे नगर-औरंगाबाद रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकरी हिताच्या विरुद्ध असून भांडवलदार धार्जिणे आहेत. शेती कार्पोरेट क्षेत्राच्या घशात घालणार्‍या या कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. कायद्यात हमीभावाची तसेच किमान आधारभूत भावाची कुठलीही तरतूद नाही. कायद्यामुळे मार्केट कमिट्या मोडीत निघणार असून शेतकर्‍यांचे एक प्रकारे संरक्षण काढून घेण्याचा हा प्रकार आहे. नव्या कायद्यामुळे शेतकर्‍यांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे हे तिनही कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत. वीज कायदा 2020 हा वीजेसंबधीत सर्व खासगीकरणास प्रोत्साहन देणारा व वीज क्षेत्र भाडवलदारांच्या ताब्यात देणारा आहे. तो मागे घेण्यात यावा. हमी भावाचा कायदा करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिले.

तत्पूर्वी महामार्गाजवळील आवारात आंदोलकांनी छोटी सभा घेतली. वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला. उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कॉ. बाबा आरगडे, कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, अ‍ॅड.वसंत नवले आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी दादा नाबदे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, कॉ. भारत आरगडे, भागचंद चावरे, दिगंबर गोंधळी, मुकुंद ठोंबरे, भाऊसाहेब आरगडे, कॉ. लक्ष्मण कडू, बापूसाहेब आढागळे, भास्कर लिहीनार, रावसाहेब मगर, दत्तात्रय वाकचौरे, नामदेव गोरे, गणेश झगरे, भाऊसाहेब दारकुंडे, रज्जाक सय्यद, पेत्रस साळवे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या