Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागृहमंत्र्यांची शेतकऱी संघटनांच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक

गृहमंत्र्यांची शेतकऱी संघटनांच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक

नवी दिल्ली l New Delhi (सुरेखा टाकसाळ) :

शेतकऱी संधटनांच्या यशस्वी देशव्यापी “भारत बंद” नंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रात्री उशिरा शेतकऱी संघटनांच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेण्याचे ठरविले आहे. शेतकरी संघटना व सरकारमध्ये उद्या होणाऱ्या ६ व्या चर्चेच्या पूर्वसंध्येवर होणार ही अनौपचारिक बैठक महत्वाची मानली जाते.

- Advertisement -

या बैठकीच्या आधी आज दुपारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकायत यांनी शाह यांच्या बरोबर या बैठकीनंतर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली होती. “आम्ही सोल्युशन पासून एक पाऊल जवळ आहोत”, असे ते म्हणाले होते.

५ डिसेंबर रोजी सरकार बरोबर चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही शेतकरी संघटना “भारत बंद” च्या निर्णयावर ठाम होत्या. या भारत बंद ला २८ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. कोणत्याही राजकीय पक्षाने आपला झेंडा व बॅनर्स सहीत आमच्या आंदोलनात येऊ नये, असे आवाहन आंदोलन कर्त्यांकडून केले गेले होते. परंतु काही पक्षांचे झेंडे आजच्या भारत बंद मध्ये काही ठिकाणी झळकले .

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, अनेक क्रिडापटू , हाॅकी खेळाडू, कुस्तीवीरांनीही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.

“या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. म्हणून मी शेतकऱ्यांना पाठिंबा देतो “, असे हजारे म्हणाले होते. तर, आंदोलनावर पाठिंबा देत हाॅकी व अन्य काही खेळाडू व कुस्तीवीरांनी आपापली पदके, पारितोषिके राष्ट्रपतींकडे परत करण्याचे ठरविले होते. परंतु त्यांना राष्ट्रपतींना भेटू दिले गेले नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या संघर्षात हात घासून राजकीय पक्ष स्वत:ची राजकीय पोळी भाजताहेत, असा आरोप भाजप तर्फे करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी तालुका पातळी पासून ते दिल्लीच्या सूनेपर्यंत गेले अनेक दिवस निदर्शने करीत आहेत.

त्यांच्या राजकीय किंवा विचारसरणीच्या छोटा वेगवेगळ्या असल्या तरी तीन कृषी कायद्यांवर विरोध व किमान आधारभूत किंमती (एम एस पी)साठी लेखी हमी किंवा स्वतंत्र कायदा , या मुद्यांवर ते एकजूट आहेत. दुसरीकडे, या कायद्यांबाबत आम्ही पुनर्विचार करण्यास तयार आहोत. पण ते मागे घेतले जाणार नाहीत, यावर सरकार ठाम आहे. हे कायदे काही नवीन नाहीत. काॅंग्रेसनेही यूपीएच्या काळात कृषी कायद्यांवर बदलण्याची भूमिका घेतली होती.

आज दिवसभरात झालेल्या घडामोडींमधे, पंतप्रधान मोदी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे वरिष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांच्याबरोबर दूरध्वनीवर संपर्क साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

यावेळी पवार यांनी, यूपीए २ सरकारच्या कृषी कायद्यांबाबत सुधारणा करण्याच्या भूमिकेबद्दल राजनाथ सिंह यांना खुलासा केल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या