Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याखासदार उदयनराजे यांच्याकडून पवारांसोबतचा फोटो शेअर

खासदार उदयनराजे यांच्याकडून पवारांसोबतचा फोटो शेअर

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस (Happy Birthday Sharad Pawar) आहे. यानिमित्ताने देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना अनोख्या अंदाजाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…

- Advertisement -

उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

ते म्हणतात, ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, आपणास दीर्घायुष्य लाभो’

‘शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा 80 वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे, परंतु, सर्व खबरदारी घेवून जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार साहेबांना राजकारणात झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या