Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादला शिवरायांचा ५२ फुटांचा अश्वारूढ पुतळा 

औरंगाबादला शिवरायांचा ५२ फुटांचा अश्वारूढ पुतळा 

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रतिकृतीचे महापालिकेत सादरीकरण करण्यात आले. यावेळी आजी, माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. या पुतळ्याची चौथाऱ्यासह जमिनीपासून उंची ५२ फूट राहणार आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा चौथरा ३१ फूट उंच, तर पुतळा २१ फूट उंच आहे. प्रतिकृतीच्या सादरीकरणावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी विरोधी पक्ष नेत्या सरिता बोर्डे, माजी नगरसेवक विकास जैन, राजू शिंदे, प्रमोद राठोड, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, विनोद पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, शिल्पकार दीपक थोपटे, आर्किटेक्ट धीरज देशमुख उपस्थित होते. पुतळ्याबद्दल सूचना आमदार बागडे यांनी प्रतिकृतीबद्दल सूचना केल्या. घोड्याचा डावा पाय हवेत असावा, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या घोड्याचे अलंकार स्पष्ट दिसावेत, घोड्याच्या दोन्ही पायातील अंतर सारखे असावे, असे ते म्हणाले. पृथ्वीराज पवार यांनी शिवाजी महाराजांची तलवार उंच असावी, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या