Friday, May 3, 2024
Homeजळगाववाहतूक शाखेकडून 2 कोटींचा दंड शासनाच्या तिजोरीत

वाहतूक शाखेकडून 2 कोटींचा दंड शासनाच्या तिजोरीत

किशोर पाटील – Jalgaon – जळगाव :

शहर वाहतूक शाखेकडून या वर्षभरातून कारवाईची मोहीम राबवून 79 हजार केसेस करण्यात येवून त्याव्दारे वाहनधारकांना दोन कोटी 19 लाख 9 हजार 350 रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे.

- Advertisement -

1 जानेवारी 2020 ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यानची कोटीच्या घरात असलेली ही आकडेवारी लक्षात घेता मुंबई, पुणे या मेट्रोसीटीप्रमाणेच कारवाया करुन जळगाव शहर वाहतूक शाखेने उल्लेखनीय अशी कामगिरी पार पाडली आहे.

गेल्या वर्षी 33 हजार 610 केसेस करण्यात येवून 39 लाख 16 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा वाहतूक शाखेने तिप्पट दंड वसूल केला आहे.

सीसीटीव्ही तसेच ई-चलन मशीनच्या माध्यमातून आता थेट वाहनधारकाच्या घरीच चलन जात असल्याने काही प्रमाणात का होईना बेशिस्त वाहतुकीला आळा बसला आहे.

वाहतूक शाखेच्या 81 कर्मचार्‍यांची कामगिरी

शहर वाहतूक शाखेत एकूण 81 कर्मचारी आहे. शहरात विविध ठिकाणच्या 15 ते 20 पॉईंट असून या पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य चौकांमध्ये नियमितपणे कर्मचारी तैनात असतात.

या बरोबरच शहर वाहतूक शाखेकडून शहरात कारवाईची मोहीम राबविण्यात येत असते. यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई, एकेरी वाहतूक असतांना नियमांचे उल्लंघन या बरोबरच अचानकपणे रस्त्यावर उतरुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.

नेत्रम कक्षाच्या माध्यमातून 15 लाखांचा दंड वसूल

जिल्हा पोलीस दलाकडून शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामाध्यमातून शहरातील सर्व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या वरती नेत्रम नावाने कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

याठिकाणी हेड कॉन्स्टेबल उत्तमराव साबळे, पंडित साळी, सोपान पाटील हे 24 तास कर्तव्य बजावत असतात. त्याच्यामाध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासह नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असते.

या वर्षी या सीसीटीव्ही कक्षाव्दारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या 12 हजार 860 वाहनधारकांवर कारवाई करण्यात येवून 15 लाख 34 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वर्षभरात 79 हजार वाहनधारकांवर कारवाई

1 जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान शहर वाहतूक शाखेने ई-चलनच्या माध्यमातून 12 हजार 860 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. तर ई-चलन मशीनच्या माध्यमातून 66 हजार 208 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईव्दारे 55 लाख 80 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 34 हजार 400 रुपयांचा दंड आजपावेतेा वसूल करण्यात आला आहे.

तर ई चलनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईव्दारे 1 कोटी 63 लाख 28 हजार 750 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 51 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण 66 लाख 34 लाख 800 रुपयांचा वसूल करण्यात येवून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या चार महिन्यात आठ लाख वसूल

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला. मार्च ते जून दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.

शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे तसेच वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार या काळातही शहर वाहतूक शाखेने 12 हजार 964 वाहनधारकांवर कारवाई करुन 8 लाख 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला.

यात कोरोनामुळे ड्रन्क अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यास वरिष्ठ पातळीवरुन परवानगी देण्यात आलेली नाही. अद्यापही हे आदेश कायम आहे. अन्यथा वसूल झालेल्या दंडाच्या रकमेत अजून वाढ झाली असती असे पो.नि. देवीदास कुनगर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या