Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपचे 57 नगरसेवक अनाथ !

भाजपचे 57 नगरसेवक अनाथ !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

8 वर्षांत 25 कोटींचा विकासकामांचा निधी आमदारांच्या हट्टामूळे खर्च होवू शकला नाही. शहराला सुरेशदादांनंतर सक्षम नेतृत्व मिळाले नसून त्यांच्याच पक्षातील नगरसेवक आमदारांना विचारत नसून त्यांच ऐकतही नाही.

- Advertisement -

अशीच परिस्थिती राहिली ज्या शहराला नेतृत्व राहणार नाही तर 57 नगरसेवकांची परिस्थिती ही विना मायबाप असलेल्या पोरांसारखी असल्याचा घाणाघाती आरोप मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील व मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी संयुक्तीरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील विकासकामांबाबत व आमदारांच्या नेतृत्वाबाबत टिका केली.

पुढे बोलतांना सुनिल महाजन म्हणाले की, भाजपात यादवी सुरु झाली आहे. सत्ताधार्‍यांची पाच वर्ष केवळ घोषणांमध्ये वाया गेली आहे.

एका वर्षात शहराच स्वरुप बदलणार होते परंतु खरोरच भयानक रित्या शहराच स्वरुप बदलल असून घरातून बाहेर निघतांना दहा वेळा विचार करावा लागत आहे.

तक्रार करुन थांबविला प्रस्ताव

शहरातील विकासकामांसाठी 25 कोटींच्या निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्यावेळी आमदार भोळेंनी त्याबाबत तक्रारी करुन तो प्रस्ताव थांबवून ठेवला होता.

ज्यावेळी आमदारांनी सत्ता राज्यात होती तो विकासकामांसाठी त्यांचा सुवर्णकाळ होता. परंतु त्यांनी ही संधी गमविली असून आता केवळ राज्य शासनाच्या नावाने बोंबलण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

भाजपाला विसर्जीत करण्याची वेळ

ज्या योजना शहराच्या विकासांसाठी आल्या होत्या. त्या योजनांच्या टाळूवरच लोणी या सत्ताधारी भाजपवाल्यांनी खाल्ल आणि आता शहरात सुरु असलेल्या योजनांच्या कामाकडे आता कोणी लक्ष देत नाही.

मनपाकडून या योजनांचे नियोजनबद्ध प्रस्ताव सादर झाले नाहीत. त्यात देखील सावळा गोंधळ असून यात जे जे दोषी अधिकारी असतील त्यांना सेवेतून बडतर्फ कराव.

गटातटाच्या राजकारणामूळे सत्ताधारी भाजपाला विसर्जीत करण्याची वेळ आली असून त्याशिवाय शहराचा विकास होणार नसल्याचे सुनिल महाजन यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या