Sunday, May 5, 2024
HomeUncategorized‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना हिताची

‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना हिताची

लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, यांची कमतरता जाणवू नये यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी नोडल अधिकारी म्हणून धुरा सांभाळत, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे उपसंचालक संजय पवार यांचेसह कृषि विभाग यंत्रणेने शेतकर्‍यांचा शेतमाल, फळे, भाजीपाला, थेट नागरीकांच्या घरापर्यत पोचविण्याचे नियोजन केले.

यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी, शेतकरी गट, आत्मा गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोदणी करीत भाजीपाला बाजारात ग्राहकांची गर्दी होउ नये तसेच शेतकर्‍यांना आपला भाजीपाला सुरक्षीत सुलभरित्या विक्री करता येण्यासाठी शेतकर्‍यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यत पोचविण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी शेतकरी गटांशी चर्चा करून शेतातील भाजीपाला, फळे ग्राहकांच्या दारापर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले.

- Advertisement -

यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून सर्व तालुकास्तरावर असलेली यंत्रणा, सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र करीत शेतमाल विक्रीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. आत्मा आणि कृषी विभाग यांनी तयार केलेली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेले परवाने उपलब्ध करीत शेतमाल पिकविणार्‍या शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक संकल्पनेच्या माध्यमातून प्रोत्साहित केले.

जिल्हयातील शेतकरी, 883 शेतकरी गट, उत्पादक कंंपन्यांच्या माध्यमातून लॉकडाउन काळात दि.27 मार्च पासून ते तिसरा लॉकडाउन संपेपर्यत 17 हजार क्विंटल फळे भाजीपाला उत्पादनाचे वितरणाचे नियोजन जिल्हा कृषी अधिक्षकांच्या मार्गदर्शनातून 31 कोटी रूपयांची उलाढाल करण्यात आली. यातून शेतकर्‍यांना आर्थीक सहाय्य तर मिळालेच सर्वसामान्य नागरीकांना घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाल्याने दिसासा मिळाला होता.

या प्रक्रियेत शेतकरी आपल्या शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिकला असून 14 कोटी 25 लाख रूपये मूल्याची 9500 क्विंटल फळे, 16कोटी 75लाख रूपयांचा 7500 क्विंटल भाजीपाला विक्री केला. यात कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, वांगेे, भेंडी, आंबा, केळी, टरबूज, मोसंबी, खरबूज विक्री झाली आहे.

शेतकरी आतापर्यत केवळ व्यापार्‍यांच्या माध्यमातून आपला भाजीपाला, फळे आदी शेतमाल उत्पादन करीत व्यापार्‍यांच्या हातचे बाहूले बनला होता. बाजार समिती, व्यापारी यांच्या चक्रात असलेले शेतकरी थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीच्या संकल्पनेत एक नविन आत्मविश्वास निर्माण झाला असून कृषी विभागाच्या सहकार्य संकल्पनेतून शेतीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात देखिल कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक हि संकल्पना अविरत सुरू राहण्यासाठी विभागातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल.

शब्दांकन- कृष्णराज पाटील (उपसंपादक)

- Advertisment -

ताज्या बातम्या