Friday, May 3, 2024
Homeनगरखंडणीच्या गुन्ह्यात स्वामीला पुन्हा अटक

खंडणीच्या गुन्ह्यात स्वामीला पुन्हा अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जामिनावर सुटलेला लॉरेन्स स्वामीला गुरुवारी भिंगार पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. भिंगार पोलीस ठाण्यामध्ये स्वामी यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

- Advertisement -

त्या गुन्ह्यात स्वामीला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्वामी याच्यावर दरोड्याच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला जिल्हा न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला होता. भिंगारमध्ये 23 नोव्हेंबर पुरणचंद जोशी हे गाडीतून जात असताना त्यांना स्वामीने गाडी आडवी लावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 50 लाखांची खंडणी मागितली होती.

पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल अशी धमकी दिली. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात स्वामी विरोधात खंडणी, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात स्वामीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या