Friday, May 3, 2024
Homeराजकीयचोपडा : 52 ग्रामपंचायती पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध

चोपडा : 52 ग्रामपंचायती पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध

चोपडा – Chopda – प्रतिनिधी :

चोपडा तालुक्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू असून आज दि.4 जानेवारी रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी 52 ग्रामपंचायती पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

- Advertisement -

त्यात भार्डू,भवाळे,मजरेहोळ,चांदसणी,मौजे हिंगोणा, मामलदे, धनवाडी,कुरवेल,माचला,गलंगी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दिवसभर 52 ग्रामपंचायतीसाठी माघार घेण्याचे कामकाज शांततेत पार पडले.दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून निवडणूक निरीक्षक ए.जे.तडवी हे सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात थांबून होते.

चोपडा तालुक्यातील खाचणे,मामलदे,चहार्डी, देवगाव,दगडी बु!,भार्डू,वेळोदे,मौजे हिंगोणे, गरताड ,चुंचाळे ,चांदसणी ,धानोरा प्र.अ., नागलवाडी माचले,विरवाडे,पुनगाव,कमळगाव वढोदा,मोहिदा,गोरगावलेबु!,निमगव्हाण,कुरवेल,गलंगी,खर्डी,घोडगाव,बिडगाव,मितावली,बुधगाव,अनवर्दे बु! ,दोंदवाडे ,धनवाडी ,भवाळे ,मजरे हिंगोणे,चौगाव,लोणी,हातेड बु!,गलवाडे,मंगरूळ खेडीभोकरी,अजंटीसिम,पंचक,कुसुंबे,मजरेहोळ,अकुलखेडे,वरगव्हाण,विटनेर,तांदलवाडी, वेले- आखतवाडे,काजीपूरा,घाडवेल,वर्डी,रुखनखेडे प्र. अ. अशा 52 ग्रामपंचायतीसाठी 1329 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

त्यात छाननीत 1329 पैकी पुनगाव,घोडगाव,बुधगाव,वर्डी अशा चार ग्रामपंचायतींमध्ये आठ अर्ज अवैध तर 1321 अर्ज वैध झाले होते.

दरम्यान दि. 4 जानेवारी रोजी माघारीच्या दिवशी एकूण-52 ग्रामपंचायती पैकी भार्डू,भवाळे,मजरेहोळ,चांदसणी,मौजे हिंगोणा,मामलदे,धनवाडी,कुरवेल,माचला,गलंगी या दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत.

तर 415 उमेदवारांनी माघार घेतली आहे. दहा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढील प्रमाणे भार्डू-7,भवाळे-7,मजरेहोळ -7 ,चांदसणी-7,मौजे हिंगोणा-7, मामलदे- 11, धनवाडी-7, कुरवेल-9,माचला-9, गलंगी-9 असे 80 सदस्य तर 42 ग्रामपंचायतीत 79 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.

त्यात चहार्डी ग्रामपंचायतीत वार्ड क्रमांक-4 मध्ये अनुसूचित जमाती जागेसाठी अर्जुन देवराम कोळी बिनविरोध निवडून आले आहेत.माघारी नंतर 715 उमेदवारी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अनेक ग्रामपंचायतीत चुरशीच्या निवडणूका होत आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक ए.जे.तडवी यांची चोपडा भेट धुळे जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक ए.जे.तडवी आज माघारीच्या दिवशी दिवसभर तहसील कार्यालयात थांबून ग्रामपंचायत निवडणूक कामाचा आढावा घेतला.

यावेळी तहसीलदार छगन वाघ,निवडणूक नायब तहसीलदार राजेश पउळ,नायब तहसीलदार महेश साळुंखे,प्रभारी नायब तहसीलदार एच.यु.सय्यद,निवडणूक शाखेतील अव्वल कारकून सुरेश पाटील, निवडणूक सहाय्यक नरेंद्र सोनवणे तसेच 52 ग्रामपंचायतींचे निवडणूक अधिकारी व महसूल कर्मचारी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे कामकाज शांततेत पार पडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या