Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील दोन दिवस पावसाचे

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे

मुंबई

मंगळवारी सकाळी उत्तर महाराष्ट्रातील काही भागात तुरळक पाऊस झाला. पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण होते. काही भागात सकाळी पाऊसही झाला. ७ आणि ८ जानेवारी रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ जानेवारी दक्षिण कोकण गोवा व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह कडकडाट होण्याची शक्यता आहे. ७ जानेवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाचे कारण काय?

अरबी समुद्राच्या वायव्य भागापासून ते उत्तर पंजाब आणि गुजरात दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच सौराष्ट, कच्छ आणि राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या