Thursday, May 2, 2024
Homeराजकीयनामांतरामध्ये जाणीवपूर्णक तेढ निर्माण केली जात आहे - नीलम गोऱ्हे

नामांतरामध्ये जाणीवपूर्णक तेढ निर्माण केली जात आहे – नीलम गोऱ्हे

पुणे (प्रतिनिधी) –

संभाजीनगरचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर योग्यवेळी मुख्यमंत्री निर्णय घेतील, आता काहीजण पुण्याचे नामकरण जिजापूर करा

- Advertisement -

अशी मागणी करत आहेत. मात्र, मला वाटते हे लोक नामांतरामध्ये जाणीवपूर्णक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. असे असले तरी मी पुण्याच्या नामकरणावर प्रतिक्रिया देणार नाही, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी ममता दिन साजरा करत. गरिबांना ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नवीन इतिहास घडविणे जगजाहीर आहे, संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवला असून त्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान आता पुण्याचे नाव जिजापूर करण्याबाबत मागणी होत आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोक नामांतरामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत

आम्ही नाटक कंपनी म्हणून काम करत असलो तरी, देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत, त्यांनी असंच काम करत राहावं, आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही,अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. मी परत येईन या वाक्याने फडणवीस यांना चांगलाच धक्का बसला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

मेहबूब शेख प्रकरणात मुलीने आपली बाजू मांडावी

दरम्यान यावेळी त्यांनी मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, राज्यात शक्ती कायदा अजून मंजूर झालेला नाहीये, त्यामुळे जुन्या गुन्ह्यांमध्ये हा कायदा लागू होणार नाही, मेहबुब शेख यांच्या बाबतीत मुलीचा पत्ता चुकीचा आहे, तिचा शोध सुरू आहे, तिनं अधिकाऱ्यांपुढे येऊन आपली बाजू मांडावी, पोलीसांच्या कारवाईत हस्तक्षेप होणार नाही, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता अथवा नेता चूकीचा असला तरी त्याव कारवाई व्हायला हवी असे नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या आहेत.

भाजपवर निशाणा

जिलेबी फाफडा हा आताचा विषय नाही, मी मुंबईकर ही मोहीम उद्धव ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी सुरू केली होती. या मोहिमेत सर्व प्रदेशातील नागरिक सहभागी झाले होते. आता गुजराती भाषिक मराठी भाषिकांमध्ये मिसळले गेले आहेत. भाजप उगाच यावरून वाद निर्माण करून पाहात असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या