Friday, May 3, 2024
Homeराजकीयउत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन

शहादा । ता.प्र.- shahada

उत्तरप्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येवून घंटानाद करण्यात आला.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सकाळी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी जिल्हा कार्यालय व शहरातील मुख्य टपाल कार्यालय बाहेर महिलांनी एकत्र येऊन घंटानाद केला. आज सकाळी नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता शितोळे यांच्यासह शितल मराठे, पंचायत समिती सदस्य ललिता बाविस्कर, कमल भिल, मला भिल, मनीषा पाटील, रेखा पाटील, सविता निकम, कविता गिरासे, मनीषा निकम, सुनिता मराठे, नूतन मराठे, कल्पना गिरासे, लक्ष्मी बागुल व मनीषा कोकणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात महिलांवर होणार्‍याा अत्याचाराचा निषेध केला आहे.

येथील राज्य शासन महिलांवरील अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरत असून सरकार गंभीर नाही. त्यामुळेच योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांच्या मूळ नावे त्यांना पत्रे दिली आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यास अजय बिष्ट सक्षम नसल्यामुळे त्यांचा तसा उल्लेख या पत्रात टाळला आहे. फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही.

लहान मुली, युवती, अंगणवाडी च्या 50 वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत, त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अशा आशयाची ही पत्रे लिहिली असून त्याचा भला मोठा गठ्ठा महाराष्ट्रातून जाणार आहे, असेही हेमलता शितोळे यांनी सांगितले.

पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. महिला सुरक्षिततेबाबत अपयशी असलेल्या केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा जाहिर निषेध यावेळी करण्यात आला. जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बाहेर घंटानाद व निषेधाच्या घोषणा महिला संघटनांकडून देण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या