Friday, May 3, 2024
HomeUncategorizedहलव्याच्या दागिन्यांनी करा संक्रांत अधिक गोड

हलव्याच्या दागिन्यांनी करा संक्रांत अधिक गोड

सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे

मकरसंक्रांत वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात या सणाने करतो. तिळगुडसोबत खासियत म्हणजे ‘हलव्याचे दागिने’. खरंतरं लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीला जोडप्याला हलव्याचे दागिने घातले जातात. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात.

- Advertisement -

संक्रातीला हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या दागिन्यांमध्ये अधिक कला-कुसर पाहायला मिळत आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा सण येत असला तरी विविध प्रकारचे दागिने नाशिकच्या बाजारपेठेत आले आहे. बांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद, हलव्याचा गजरा बाजारात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या