Friday, May 3, 2024
Homeजळगावशेतकर्‍यांच्या समर्थनार्थ लोकसंघर्ष मोर्चाच्या रॅलीने वेधले जळगावकरांचे लक्ष

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ लोकसंघर्ष मोर्चाच्या रॅलीने वेधले जळगावकरांचे लक्ष

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

दिल्ली येथे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी लोकसंषर्घ मोर्चा व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली.

- Advertisement -

या रॅलीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा राज्याध्यक्ष मुकूंद सपकाळे, लोकसंषर्घ मोर्चाचे सचिन धांडे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, भरत कर्डिले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी दुपारी 2 वाजता ही रॅली काढण्यात आली.

नरेंद्र मोदी किसान विरोधी, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, जय जवान जय किसान याप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली.

या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीचा रेल्वे स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला. रॅलीत फारूक शेख, प्रा.प्रितीलाल पवार , संजय महाजन, हरिश्चंद्र सोनवणे, श्रीकांत मोरे, प्रदीप बारेला, कृष्णा सपकाळे, ताराचंद बारेला, गेमा बारेला, नारायण बारेला, भारत सोनवणे, डिगंबर सोनवणे, मुसमाबाई पावरा, पीनाबाई बारेला, नानबाई पावरा ,निशांत मगरे चंदन बिर्हाडे, अकीलखान ईस्माईलखान, रेहान सय्यद आदींसह महिला व शेतकरी सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या