Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo Story : पंचवटीतील सरदार चौका लगत दगडातून जलस्त्रोत

Video Story : पंचवटीतील सरदार चौका लगत दगडातून जलस्त्रोत

नाशिक l Nashik

नाशिक शहरातील पवित्र गंगा गोदावरी नदी काठालगत असलेल्या रामकुंंड व गोदा घाट परिसरात पेशवेकालीन 17 कुंड असुन अनेक ठिकाणी पाण्याची जीवंत झरे असल्याची नोंद गॅझेटमध्ये आहे.

- Advertisement -

आता हे झरे मोकळे करण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असुन अगोदर दोन ठिकाणी बोअर करतांना पाणी झालेले असतांना आता सरदार चौक भागात अहिल्याराम शाळेलगत भूगिमत गटारीचे काम सुरु असतांना दगडातून पाणी लागले आहे. यावरुन गोदाकाठालगत मुबकल प्रवाही पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक शहरातील गोदावरी नदीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आणि यातील जैवविविधा पुनर्स्थापित करण्यासाठी पर्यावरणप्रेमी व गोदाप्रेमी नाशिककरांकडुन प्रयत्न केले जात आहे. यात न्यायालयात जनहित याचिकांद्वारे प्रदुषणमुक्तीचे आणि गोदाघाट कॉक्रीटीकरणमुक्तीचे काम सुरु झाले आहे.

यात गोदावरी प्रदुषणमुक्तीच्या माध्यमातून गोदावरीतून नाले व अथवा मलजल येणार नाही, याकरित भूमिगत मलजल वाहिन्या तयार करण्याचे काम सुरु आहे. अशाच एका भूमिगत गटारीचे काम सरदार चौक भागातील अहिल्याराम व्यायाम शाळेलगत काम सुरू आहे. याठिकाणी पंधरा ते वीस फुट खोल फॉकलेन मशिनने खोदल्यानंतर एका ठिकाणी अतिशय टणक दगडातून पाणी बाहेर येऊ लागले आहे.

अनेकदा पाणी बाहेर काढुन देखील पाणी थांबत नाही. आता गोदा काठालगत प्रवाही पाणी असल्याचे समोर आले आहे. भूमिगत गटारीकरिता ही निवडण्यात आलेली जागा चुकीची असल्याचा आरोप गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केला आहे. यामुळे हे काम संथ गतीने सुरु असल्याने याचा फटका याभागातील व्यावसायिकांना बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या