Tuesday, May 7, 2024
Homeनगरबुऱ्हाणनगरवर कर्डिले यांचे वर्चस्व

बुऱ्हाणनगरवर कर्डिले यांचे वर्चस्व

अहमदनगर (प्रतिनिधी)

तालुक्यातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व असत्याचे निवडणूक निकालावरून दिसले.

- Advertisement -

कडिले यांच्या ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत बाजी मारली. 15 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी उर्वरित 7 जागांसाठी उमेदवार दिल्याने बुर्‍हाणनगरला अनेक वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली. प्रचारादरम्यान विरोधकांनी कर्डिले यांच्या कार्यपध्दतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र मतदारांनी कर्डिले यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करीत सर्व सातही जागांवर ग्रामविकास पॅनलला विजयी केले. त्यामुळे बुर्‍हाणनगरवरील कर्डिले यांची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या