Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसामान्यांना मराठीतून विज्ञान समजवणारे डॉ.नारळीकर

सामान्यांना मराठीतून विज्ञान समजवणारे डॉ.नारळीकर

वैज्ञानिक साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली. सामान्य माणसांना साध्या सोप्या मराठीतून विज्ञान समजवणारे डॉ.नारळीकर यांच्यामुळे मराठीत विज्ञान कथा प्रचलित झाल्या. यामुळे त्यांच्यावर साहित्य अकादमीने त्यांच्यांवर लघुपट काढला. मराठीतील विज्ञान त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगभरात नेला.

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

- Advertisement -

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून ते प्रसारमाध्यमांचा वापर करत होते.

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. जयंत नारळीकर यांनी लिहिलेली ब्रह्मांड ही मालिका पुर्वी दुरदर्शनवर येत होती.

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते.आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. यामुळे घरुनच त्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळाले. विज्ञानाची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. आईमुळे त्यांचा संस्कृतकडे तर वडिलांमुळे गणिताकडे कल होता.

जीवनावर लघुपट

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.

विज्ञानकथा पुस्तके

अंतराळातील भस्मासुर

अंतराळातील स्फोट

अभयारण्य

चला जाऊ अवकाश सफरीला

टाइम मशीनची किमया

प्रेषित

यक्षांची देणगी

याला जीवन ऐसे नाव

वामन परत न आला

व्हायरस

विज्ञानविषयक पुस्तके

अंतराळ आणि विज्ञान

आकाशाशी जडले नाते

गणितातील गमतीजमती

नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)

नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान

Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)

युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)

विश्वाची रचना

विज्ञान आणि वैज्ञानिक

विज्ञानगंगेची अवखळ वळणे

विज्ञानाची गरुडझेप

विज्ञानाचे रचयिते

समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)

Seven Wonders Of The Cosmos

सूर्याचा प्रकोप

आत्मचरित्र

चार नगरांतले माझे विश्व

मिळालेले पुरस्कार

१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.

त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.

२०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३

जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.

‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार

अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)

फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार

- Advertisment -

ताज्या बातम्या