Friday, May 3, 2024
Homeजळगावटेन्ट हाऊसच्या गोदामास आग, 20 लाखांचे साहित्य जळून खाक

टेन्ट हाऊसच्या गोदामास आग, 20 लाखांचे साहित्य जळून खाक

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या जय अंबे या टेंट हाऊसच्या गोदामास रविवारी सकाळी 10.15 वाजता आग लागली. या आगीत गोदामातील सुमारे 20 लाख रुपयांचे साहित्य जळुन खाक झाले.

- Advertisement -

शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील टागोर नगर येथील रहिवासी वैभव नरेश परदेशी यांच्या मालकीचे टागोर नगरातच जय अंबे टेंट हाऊस आहे. या टेंट हाऊसचे गादाम एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये आहे. रविवारी सकाळी 10.15 वाजता गोदामातून अचानकपणे धुर निघत असल्याचे सुरक्षारक्षक सुधाकर साबळे याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच गोदामाकडे धाव घेतली असता आतमध्ये आग लागल्याचे निष्पन्न झाले.

एका तास सुरु होती आग

साबळे यांनी शेजारील कंपनीमधील कामगारांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या दोन अग्निशमन विभागाच्या बंबाने पाण्याचा मारा केल्यावर सुमारे एक तासात आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत आगीत या गोदामात कापड, कापुस, लाकुड, प्लॅस्टीकच्या वस्तु असल्यामुळे आगीत लागलीच सर्वकाही जळुन खाक झाले होते.

गोदामातील खुर्च्यां, सोफ्यासह साहित्य खाक

या आगीत गोदामातील 500 खुर्च्या 20 कुलर, 6 महाराजा सोफा, 2 महाराजा स्टेज, 400 सिलींग, 300 मॅटींग, 8 महाराजा खुर्ची व मंडप व किरकोळ सामान असे सुमारे 20 लाख रुपयांचे साहित्य जळुन खाक झाले आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या