Sunday, May 5, 2024
Homeनगर..तरच आ. कानडे यांनी राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्यावर शिंतोडे उठवावे - गोंदकर

..तरच आ. कानडे यांनी राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्यावर शिंतोडे उठवावे – गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी सामान्य माणूस स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही, याची चिंता काँग्रेस पक्षाला वाटू लागली आहे. श्रीराम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत असून आ. लहू कानडे टिका करतांना अगोदर स्वकर्तुत्वावर केलेल्या गोष्टींचा आढावा घ्यावा मगच अशा राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्यावर शिंतोडे उठवावे असे सडेतोड उत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिले असून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की अयोध्येमध्ये भव्य राममंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा करण्याच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून त्यास सर्वसामान्य लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून गेल्या दीड – दोन वर्षात कुरघोडीचं राजकारण करणार्‍या सत्ताधारी पक्षामध्ये याबाबत नकारात्मक वातावरण दिसून येते आहे. आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.अशावेळी आ. लहू कानडे यांनी राममंदिर निधी अभियानावर ताशेरे ओढले आहे.

निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणार्‍याकडे सुपूर्द करीत आहेत. निधी संकलन करणार्‍या संघटनांवर विश्वास असल्याने गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहे. हे एकंदरीतच चित्र बघून काँग्रेसला मतांच्या राजकारणासाठी श्रीराम मंदिरासारख्या पवित्र कार्यास हातभार न लावता उलट त्यावर आक्षेप घेत त्यांची मतांच्या राजकारणासाठी होणारी घालमेल दिसून येत आहे .

गैरमार्गाने कमावलेली प्रतिमा असणारे लोक आज राममंदिरा सारख्या पवित्र कार्यावर आक्षेप घेत आहे, त्याआधी त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ व राष्ट्र निर्माणाच्या कार्यावर ताशेरे ओढण्याइतकी चांगली आहे का ? याचा सखोल अभ्यास करावा, असग श्री. गोंदकर यांनी म्हटले आहे. संत व हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे काँग्रेसची जुनी परंपरा आहे, असे म्हणत त्यांनी तथाकथित आमदारांंवर निषेधात्मक असंतोष व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या