Friday, May 3, 2024
Homeजळगावशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

जळगाव – Jalgaon

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतील संशोधन आणि विकास कक्षामार्फत “तंत्र शिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रम” प्रायोजित अभियांत्रिकी शास्त्र आणि तंत्रज्ञानामधील उदयोन्मुख कल यावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली.

- Advertisement -

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीचा विचार करता, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संमेलनाचे संयोजक प्रा.डॉ.देवेंद्र चौधरी यांनी उद्योन्मुख कलाच्या संशोधनात नाविन्यता असण्याची अपेक्षा केली. जैविक ज्ञान आत्मसात करुन बहु-अनुशासित अभियांत्रिकी शिक्षण ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. विविध माहिती विज्ञानाचा वापर करुन कृत्रिम बुध्दिमत्ता विकसीत करणे, संशोधनाची अंमलबजावणी समाजाच्या उपयोगाकरीता करुन त्या अनुषंगाने देशाच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे यावर भर दिला.

याप्रसंगी परिषदेच्या यशस्वीतेकरीता संचालक आणि प्रधान सचिव, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पाठविलेल्या संदेशांचे वाचन केले. तसेच परिषदेत सहभागींचे सादरीकरण तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ प्रत्यक्ष व दूरस्थ पध्दतीने सहभागी होऊन ज्ञानर्जन करीत असल्याचा उल्लेख केला.

संशोधन व नाविन्यता यासोबत मूलभूततेतून सद्य:स्थितीतील संगणक आणि आज्ञा प्रणालीचा विकास, याकरीता देशातील विविध उच्चस्तरीय समित्यांमधील राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सहभाग, याबाबत उत्तराखंड तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु, प्रा.डॉ.नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र कोकाटे यांनी कार्यक्रमाची उपयोगीता, तसेच सद्यस्थितीनुसार करावी लागलेली कसरत व “तंत्रशिक्षण गुणवत्तासुधार कार्यक्रम” या अंतर्गत सदर परिषदेचे होत असलेले आयोजन याबाबत शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात अणुविद्युत, स्थापत्य, यंत्र इत्यादी अभियांत्रिकी संबंधित संशोधनपर निबंधांचे वाचन करण्यात आले तसेच संशोधकांना सुधारणेकरीता तज्ञांकडून उपयुक्त सूचना मिळाल्या. या परिषदेदरम्यान अमेरीकेत उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी याबाबत अमेरीकास्थित तज्ञ विलास साळगांवकर यांनी दूरस्थ संवाद साधत सहभागींचे शंका निरसन केले. सत्राच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी चर्चेचा समारोप केला. ज्यामध्ये, विविध विषय तज्ञांनी संशोधनात उद्योन्मुख कलाच्या वापरासंदर्भात सहभागींना प्रबोधन केले. कार्यक्रमाचे समन्वयक समाधान कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संशोधन आणि विकास कक्षातील तसेच संस्थेतील अध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या