Tuesday, May 7, 2024
Homeनगरपुणतांबा कोपरगाव मार्गाला वाली आहे का ? - डॉ. धनवटे

पुणतांबा कोपरगाव मार्गाला वाली आहे का ? – डॉ. धनवटे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा कोपरगाव या राज्य मार्गावरील पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होण्यास कारणीभूत ठरत आहे.

- Advertisement -

खड्ड्यांमुळे हा राज्यमार्ग आहे का? इतकी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याला वाली आहे की नाही कुणी? असे म्हणण्याची वेळ परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे. या रस्त्याची दुरवस्था समृद्धी महामार्गाच्या कामामुळे होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनीधींनी याची दखल घेऊन रस्ता मजबूत सिमेंटचा किंवा डांबरीकरण करावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरपंच डॉ. धनंजय धनवटे यानी दिला आहे.

समृद्धी महामार्ग कोपरगाव-पुणतांबा मार्गाजवळून जात आहे. या रस्त्यावर उड्डाणपुलासह भरावासाठी माती, मुरूम वाहतूक मोठ्या प्रमाणात परिसरातून सुरू आहे. या रस्याच्या कामामुळे कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे, रस्तापूर, पुणतांबा, श्रीरामपूर या राज्यमार्गची धुळधाण झाली आहे.

रात्रंदिवस समृद्धी महामार्ग भरावाच्या कामाकरिता अनेक डंपरने माती मुरूम वाहतूक जोरात सुरू आहे. समृद्धी महामार्गाचे काम झाले पाहिजे, परंतु परिसरातील शेतकरी, व्यवसायिक, सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन वापरातील रस्ते खराब न करता काम केले पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोपरगाव-पुणतांबा या रस्त्याचे काम पूर्ववत चांगले होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन हा रस्ता मजबूत सिमेंट काँक्रिट किंवा डांबरीकरण करावा, अशी मागणी केली. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या