Thursday, May 2, 2024
Homeनगरतहसीलदार पाटील यांचा ग्रामपंचायत उमेदवारांना 'हा' इशारा

तहसीलदार पाटील यांचा ग्रामपंचायत उमेदवारांना ‘हा’ इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रीया पार पडली असून खर्च सादर करण्याची

- Advertisement -

मुदत संपूनही अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रीया पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरण एक महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक होते. त्यांनी एकत्रित खर्चाचे विवरणपत्र मुदतीत दि. 17 फेब्रुवारी 2021 पुर्वी सादर करणे आवश्यक होते.

मुदत संपूनही निवडणूक खर्चाचे विवरण सादर न करणार्‍या उमेदवारांनी केलेल्या कालमर्यादेत निवडणूक खर्चाची विवरणे सादर करण्यात कसुर करतील, त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी निर्रह ठरविण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आलेला आहे.

तरी अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 1 4-ब(1) अन्वये निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या