Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसंमेलनासाठी पाणीपुरवठा व्यवस्था समितीची बैठक

संमेलनासाठी पाणीपुरवठा व्यवस्था समितीची बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था समितीच्या सभा पालक पदाधिकारी सुनील भुरे व प्रमुख सुनील वाणी यांच्या उपस्थित संपन्न झाली. संमेलनकाळात तिन्ही दिवस संमेलन परिसरात 24 तास किमान 2 घंटागाडी उपलब्ध करणे, मनपाचे किमान 20 स्वच्छता कर्मचारी सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत परिसरात उपस्थित राहतील याची काळजी घेणे, दररोज संध्याकाळी फॉगिंग होईल हे पाहणे, भोजनस्थळी पूर्णपणे स्वच्छता राहील याची दक्षता घेणे, किमान 100 ठिकाणी डस्टबीनची व्यवस्था करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे या विषयांवर चर्चा झाली. या सभेस नंदकिशोर हरकुट, रोहिणी रकटे, हिमांशू धोडपकर, तुषार सावरकर आदी समिती सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

संयोजन व नियोजन समितीची सभा समिती प्रमुख प्रशांत व प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. दि. 26 ते 28 मार्च 2021 रोजी प्रमुख कार्यक्रम असल्याने त्या दृष्टीने मंडप उभारणी, स्टेजची व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांचे वाटप, प्रमाणपत्र वाटप, बाहेरून आलेल्या पाहुण्याची व्यवस्था, रसिकांची उपस्थिती, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, स्टॉलधारकांना येणार्‍या अडचणी, पोलीस यंत्रणा व शासन यंत्रणेशी संपर्क आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

तसेच संमेलनादिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत यातील नियोजनावर चर्चा झाली व त्याप्रमाणे नियोजन करण्याचे ठरले. यावेळी मिलिंद कुलकर्णी, प्रीतम नाईक, विद्या खरात, ऍड. अविनाश देशपांडे, रुपाली नेर, पराग घारपुरे, महेंद्र बच्छाव, डॉ. भास्कर गिरिधारी, मंगेश मालपाठक आदी उपस्थित होते. तसेच सत्कार समिती, काव्यवाचन व नियोजन समिती व सभामंडप सजावट समितीच्याही सभा संपन्न झाल्या.

नव्याने आराखडा

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जागा निश्चित झाल्यानंतर वास्तूशास्त्र महाविद्यालयाकडून आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यात मुख्य सभागृहात बदल केल्यामुळे पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. आयोजकांच्या तांत्रिक चुकीमुळे संमेलनासाठी येणार्‍या महत्त्वाच्या व्यक्तींना पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे. संमेलनस्थळ म्हणून महामंडळाकडून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणास मान्यता देण्यात आली होती. मात्र, लोकहितवादी मंडळाला नियोजन करताना ही जागा कमी वाटत असल्याने संमेलन सभागृह हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे करत असताना व्हीआयपी कक्षाचे स्थलांतर करण्याचा विसर पडल्याने पायपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.

संमेलनाची जागा निश्चित झाल्यानंतर वास्तूशास्त्र महाविद्यालयाकडून आराखडाही तयार करण्यात आला होता. मात्र, त्यात मुख्य सभागृहात बदल केल्यामुळे पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. पूर्वनियोजनानुसार संमेलन सभागृह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर व मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष स्थापन करण्याची योजना होती. आता मुख्य सभागृह क्रिकेट मैदानावर होत आहे. मात्र, व्हीआयपी कक्षात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. व्हीआयपी कक्षापासून हे मैदान लांब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या