Friday, May 3, 2024
Homeनगरमालदाड येथून दागिने लांबविणार्‍या आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा

मालदाड येथून दागिने लांबविणार्‍या आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा

तळेगाव दिघे |वार्ताहर|Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बँगमध्ये ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या

- Advertisement -

व एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज काढणार्‍या आरोपीविरुद्ध आणखी 74 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा दुसरा गुन्हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपूर ता. अकोले) यांच्याकडून पोलिसांनी दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील दि. 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भाऊपाटील देवराम नवले (वय 41) यांच्या घरासमोरून बँगेतून 75 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान तसेच 1 लाख रुपये किंमतीचे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे क्वॉईन मिळून एकूण 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास करण्यात आले होते.

भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चारचाकी गाडी पाठविली होती. सदर गाडीवर चालक म्हणून रविकिरण सुखदेव मंडलिक हा पाठविला होता. दि. 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजता रविकिरण मंडलिक याने भाऊपाटील नवले यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले. यावेळी गाडीतील बॅगा रविकिरण मंडलिक याने घरासमोर आणून ठेवल्या होत्या. बहीण मानसी राहुल वाळूंज ही दि. 31 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमध्ये दागिने नव्हते.

त्यामुळे गाडीचा चालक रविकिरण मंडलिक यानेच दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद भाऊपाटील देवराम नवले (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिली होती. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपुर, हल्ली रा. संगमनेर) यास ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली.

पोलीस तपासात आरोपीने 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे क्वॉईन राहाता येथील सोनारास विकले होते, तर एका नामांकित पतसंस्थेत 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान कर्ज गहाण ठेवून कर्ज काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

दरम्यान आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक याने 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अशोक सदाशिव नवले (वय 52 रा. मालदाड) यांच्या घरातील बॅगेतून 74 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तशी फिर्याद अशोक नवले यांनी दिल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षिका डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पो. नि. पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर तोडकरी, पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो. ना. शिवाजी डमाळे, महिला पो. कॉ. प्रमिला सहाणे यांनी ही कामगिरी केली. घटनेचा अधिक तपास पो. ना. आण्णाहेब दातीर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या