Friday, May 3, 2024
Homeनाशिककबड्डी स्पर्धेत लोकनेते हिरे महाविद्यालयाला उपविजेतेपद

कबड्डी स्पर्धेत लोकनेते हिरे महाविद्यालयाला उपविजेतेपद

पंचवटी l Panchvati (वार्ताहर) :

शिवछात्रपती क्रिडा संकुल नाशिक येथे आयोजित ३२वी किशोर व किशोरी गट कबड्डीच्या स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय व साई स्पोर्ट्स क्लब सिडको येथील महिला (किशोरी) खेळाडू यांनी उपविजेतेपद पटकाविले.

- Advertisement -

कबड्डीच्या स्पर्धेसाठी एकूण दहा महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. एल. व्ही. एच. महाविद्यालयाने स्पर्धेच्या सुरुवाती पासूनच आपले वर्चस्व राखत सर्व सामने जिंकले. स्पर्धेत प्रणाली पाटील हिला उत्कृष्ट चढाईपट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे संस्थेचे समन्वयक अपूर्व प्रशांत हिरे, संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही.एस. मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर, उपप्राचार्य डॉ. विनीत रकिबे, डॉ. संतोष चोबे, डॉ. सुनिल पाटील, क्रिडा संचालक डॉ. संतोष पवार, क्रिडा संचालिका प्रा. रोशनी गुजराथी, कनिष्ठ विभागाचे क्रिडा शिक्षक प्रा. किशोर राजगुरू, किरण गुंजाळ, राम कुमावत, यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या