Friday, May 3, 2024
Homeनगरखड्ड्यांविरोधात एबीव्हीपी आक्रमक

खड्ड्यांविरोधात एबीव्हीपी आक्रमक

शिर्डी (शहर प्रतिनिधी) –

शिर्डी-कोपरगाव महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे असंख्य अपघात टळावे व महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी

- Advertisement -

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी एकत्र येत सावळीविहीर फाटा येथे नगर-मनमाड महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात असतांना शिर्डी पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

कोपरगाव शिर्डी महामार्गावर असंख्य खड्डे पडले असून अनेक अपघात होत आहेत. यासंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. काल शनिवारी सकाळी सावळीविहीर येथे शिर्डी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलनासाठी जाऊ दिले नाही.

विद्यार्थ्यांनी रस्त्याच्याकडेला बसून झोपलेल्या शासनाच्या विरोधात सरकार हमको डरती हे, पुलीस को आगे करती है या पद्धतीची घोषणाबाजी केली. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत असतांना शिर्डी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या व्हॅनमधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

नगर-मनमाड महामार्गाहून शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या जाणार्‍या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अशी प्रतिक्रिया महाविद्यालयिन विद्यार्थिनीनि व्यक्त केली. नगर मनमाड महामार्गाची डागडुजी करा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागतो ही अत्यंत खेदाची बाब असून लवकरात लवकर नगर मनमाड महामार्ग व्यवस्थित करावा अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हजारोच्या संख्येने एकत्रित करत यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

यावेळी शिर्डी शहरमंत्री नरेश सोनवणे, तुषार महाजन, कोमल राजपूत, सिद्धेश्वर सोमाणी, नरेश पवार, मयुर चोळके, चेतन कोते, कोमल राजपूत, जागृती वाकचौरे, धनश्री राजपूत, प्रतीक पावडे, अनिकेत सोमवंशी, गोविंद चौधरी, विशाल बोरडे, साईप्रसाद वाणी, वैभव चोळके, प्रफुल खपके, साक्षी भन्साळी, वैष्णवी बनकर, मृणाली शेळके, राहुल ठुबे, साक्षी खटाळे, शिवानी जपे, साईसंपदा बलाळू, कुणाल जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या