Sunday, May 5, 2024
Homeनगरशनिअमावस्या : मंदिरच बंद

शनिअमावस्या : मंदिरच बंद

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शनि अमवस्यानिमित्त शनी मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान

- Advertisement -

विश्वस्त मंडळाने घेतला आहे. शुक्रवारी दुपारी मंदिर बंद केले जाणार असून रविवारी सकाळी दर्शन पुन्हा पूर्ववत केले जाईल, अशी माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

राज्यासह जिल्ह्यात करोनाचे रूग्ण वाढतच असल्यामुळे शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. शनी अमावस्या यात्राही रद्द करण्यात आली आहे. शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.

शिंगणापूर येथे शनी अमावस्याला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनी अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शनी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार असून शनिवारी दिवसभर दर्शन बंद राहणार आहे. रविवार (14 मार्च) पासून दर्शन व्यवस्था पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे. शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सरपंच पुष्पा बानकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, देवस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाकडून जमावबंदी

नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी दिवसभर शनिशिंगणापूरमध्ये जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी सरकारच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या