Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा कहर सुरूच!; साडेतीन महिन्यातील उच्चांक

करोनाचा कहर सुरूच!; साडेतीन महिन्यातील उच्चांक

दिल्ली | Delhi

देशातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात करोना विषाणूची लागण झाल्याची सुमारे ४३ हजाराहून अधिक नवी प्रकरणे समोर आली आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ४६ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

७ नोव्हेंबरनंतरची ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या असून मृत्यू दरही वाढला आहे. तसेच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख ४६ हजार ८१ इतकी झाली आहे.

देशात गेल्या २४ तासात २१ हजार १८० जण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत उपचारानंतर बरं झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ११ लाख इतकी आहे. तर आजपर्यंत १ लाख ५९ हजार ९७ इतकी झाली आहे.

दरम्यान वर्षभरापूर्वी (२२ मार्च २०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला होता. दरम्यान , २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू झाला होता. यावेळेत नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती, जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. मोदींच्या या निर्णयाला देशाभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र अजूनही करोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या