Sunday, May 5, 2024
Homeनाशिक'पापडाचे बिल का लावले' म्हणत हॉटेलची तोडफोड

‘पापडाचे बिल का लावले’ म्हणत हॉटेलची तोडफोड

नाशिक । Nashik

‘जेवन व दारुच्या बिलात पापडाचे बिल का लावले’ अशी विचारणा करत कुरापत काढून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये तोडफोड करत स्टाफ व वेटरला लाकडी दांडके आणि कोयत्याने मारहाण केल्याची घटना सातपूर परिसरात शनिवारी (दि. 20) घडली.

- Advertisement -

सावता माळी, बिट्टू, धिरज परदेशी (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही), शरद सुधाकर पाटील (रा. राज्य कर्मचारी वसाहत) यांच्यासह सात ते आठ जण असे या प्रकरणात संशयित आहे. याप्रकरणी शेखर सदानंद शेट्टी यांनी तिक्रार दिली आहे.

त्यानुसार, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संशयित हॉटेल राज दरबार, एमआयडीसी, सातपूर येथे गेले होते. यावेळी दारू व जेवनाच्या बिलात पापडाचे बिल का लावले, अशी विचारणा करत त्यांनी कॅश काऊंटरवरील कृष्णा शेट्टी यांच्यासोबत वाद घातला व बिल न देताच निघून गेले.

त्यानंतर थोड्या वेळाने सात ते आठ जणांना घेवून पुन्हा हॉटेलमध्ये आले व सामानाची तोडफोड केली. तसेच स्टाफ व वेटरला लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून उपस्थित ग्राहकांना देखील शिवीगाळ केली करत दशहत निर्माण केली. याप्रकरणी सातपूर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या