Friday, May 3, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेपूर्वीच वातावरण गरम

डॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेपूर्वीच वातावरण गरम

सभा रद्द करण्याची रामदास पा. धुमाळ विचार मंचाची मागणी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी कारखान्याचे सभासद मोबाईल यंत्रणा हातळण्यात अनेक शेतकरी सक्षम नसताना व पाच वर्षाच्या अनागोंदी कारभावर कोणत्याही

सभासदांनी बोलू नये म्हणून वार्षिक सभेची सभासदांना नोटीस व अहवाल दिलेला नाही. त्यामुळे डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाने ऑनलाईन आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार राहुरी तालुका रामदास पा. धुमाळ विचार मंचचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अ. नगर यांच्याकडे केली आहे.

तक्रार अर्जात म्हटले, दि. 28 मार्च रोजीची वार्षिक सर्वसाधरण सभा महाराष्ट्र सहकार कायदा 1960 व नियम 1961 तसेच डॉ.तनपुरे कारखान्याचे नोंदणीकृत असलेले उपविधी यामध्ये वार्षिक सर्वसधारण सभा घेणेबाबतचा अर्ज शर्त कायदे नमूद आहेत. सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल देणे गरजेचे आहे. या कारखान्याचे सभासद हे 25 हजाराच्यावर असून फक्त मोजक्याच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस दिल्या गेल्याचे समजते.

या बंधनकारक गोष्टींना पूर्णपणे तडा सध्याच्या असणार्‍या पदाधिकारी संचालकांनी दिला आहे. याबाबत समजलेल्या माहितीनुसार या सर्व साधारण सभेत काही विषयांवर ठराव पारित केल्याचे नियोजीत केल्याचे दिसते. त्यामुळे प्रस्तुतचा सभासदांचा तक्रारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. यामध्ये कारखाना सभासद मालकीची असणारी कोट्यवधी रुपयांची जमीन तसेच स्क्रॅप माल, भंगार विकला गेला या भंगार व जमीन विक्रीच्या पैशांचा विनीयोग कशासाठी केला? याचा तपशील नाही. तसेच भुसा, बगॅस व विम्याचे पैसे, मॉलेसिस विक्रीचा हिशोब नाही. कर्जखाती वेळेवर भरणा नाही, असे अनेक गैरप्रकार या माध्यमातून समोर आले आहेत.

त्यामुळे आज दि.28 ची ऑनलाईन वार्षिक सभासाधारण सभा तात्काळ रद्द करण्याचे आदेश संबंधितांना करावेत व योग्य ती कारवाई करावी. या तक्रार अर्जावर अमृत धुमाळ, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानदेव कोळसे, रवींद्र मोरे, सुभाष करपे, दत्तू जाधव, बाबाकाका देशमुख, अजित धुमाळ, बाळासाहेब खांदे, रामदास वने, शिवाजी ढोकणे, रामभाऊ सोळुंके, खंडू ढोकणे, आप्पासाहेब कोहकडे, आप्पासाहेब माळवदे, सुरेशराव लांबे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, बाबासाहेब धोंडे, गवजी आढाव आदींचे नावे आहेत.

विघ्नसंतोषींचे आरोप खोटे-प्रफुल्ल शेळके यांची टीका

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना खा. डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी मंडळी खोटेनाटे आरोप करत असल्याचे प्रफुल्ल शेळके यांनी म्हटले आहे.

डॉ. तनपुरे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा करोना महामारीमुळे ऑनलाइन होणार आहे. मात्र, याबाबत कारखाना व्यवस्थापनाला कधीही सहकार्य न करणारे विघ्नसंतोषी मंडळी यांनी खोट्यानाट्या तक्रारी करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. ज्यांना गावात तालुक्यात कवडीमोल किंमत आहे, असे लोक प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी व आपले कुठेतरी दाळ शिजली पाहिजे या हेतूने डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत.

या मंडळींनी आजपर्यंत कुटील उद्योग करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा उद्योग केला आहे. त्याच पद्धतीने यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते पुन्हा कारखान्याची बदनामी करू पाहत आहेत, असा आरोप प्रलउल्ल शेळके यांनी केला आहे.

तालुक्यातील सुज्ञ सभासद असून ते अशा लोकांकडे दुर्लक्ष करत असून या लोकांनी कारखान्याची बदनामी थांबवावी. मागील काळात विकास मंडळाची सत्ता असताना ज्यांनी स्वर्गीय रामदास धुमाळ यांच्या विरोधी काम केले, तेच आता कारखान्याबाबत कळवळा असल्याचे भासवत आहेत. मात्र, खा. विखे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन नामदेवराव ढोकणे व सर्व संचालक मंडळ प्रयत्नांची पराकाष्टा करून कारखाना चालवत आहेत.

तांत्रिक अडचणीमुळे कारखाना दोन महिने उशिरा सुरू झाला. तरीदेखील सुमारे दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. परंतु ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मुद्यावर खोटेनाटे आरोप होत आहेत. परंतु सभासद याकडे लक्ष देणार नाही, याची खात्री असून या सभेबाबत तक्रार करणार्‍या निवेदनावर ज्यांच्या सह्या आहेत त्या बोगस असल्याचे प्रफुल्ल शेळके यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या