Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकरोड येथील जयपूर फूट कॅम्प रद्द

नाशिकरोड येथील जयपूर फूट कॅम्प रद्द

नाशिकरोड । Nashik

नाशिकरोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दिव्यांगासाठी प्रत्येक महिन्याच्या १ ते ४ तारखेला विनामूल्य जयपूर फूट कॅम्प (शिबीर) होतो. तथापी, करोनाचा उद्रेक झाल्यामुळे एप्रिल महिन्यात होणारा हा कॅम्प रद्द करण्यात आल्याची माहिती जयराम हॉस्पिटलने दिली आहे.

- Advertisement -

या विनामूल्य शिबिरात येऊन जयपूर फूट बसवून घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून दिव्यांग बांधव येत असतात. जुने जयपूर फूट दुरुस्ती, नवीनसाठी माप घेऊन तो तयार करुन देणे आदी कामे केली जातात. सध्या करोनाचा उद्रेक झाला आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून पुढील महिन्यातील कॅम्प रद्द करण्यात आला आहे. लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटलतर्फे हे निवेदन आगाऊ निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या