Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेवळा शहरात आजपासून जनता कर्फ्यू; पहिल्याच दिवशी मिळाला प्रतिसाद

देवळा शहरात आजपासून जनता कर्फ्यू; पहिल्याच दिवशी मिळाला प्रतिसाद

देवळा | प्रतिनिधी

तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देवळा तालुक्यात आजपासून ( दि.१) १० एप्रिल पर्यंत “जनता कर्फ्यु ” चे आयोजन करण्यात आले आहे. या जनता कार्फ्युला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद देवळावासियांनी दिलेला आहे…

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्रात लोकसंख्येच्या तुलनेत देवळा तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून सद्यस्थितीत ८६७ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत.

नाशिक सह मालेगाव येथे कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झाले असून देवळा येथील कोरोना केअर सेंटरला जागा शिल्लक नसल्याने अशीच स्थिती राहिल्यास पुढील काळात भयंकर परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याने दोन दिवसांपूर्वी देवळा नगरपंचायतीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक संपन्न झाली होती.

यानंतर आजपासून (दि.१) ते १० एप्रिलपर्यंत संपूर्ण देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जनता कर्फ्यु देवळा तालुक्यात आजपासून पाळण्यास सुरुवात झाली आहे.

जनता कर्फ्यु मधून खाजगी वैद्यकीय व्यावसाईक, मेडिकल दुकाने, दूध व पीठ गिरणी यांनाच वगळण्यात आले असून किराणा व्यावसायिकांना “घरपोच सेवा” देण्याची सवलत देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या