Sunday, May 5, 2024
Homeनाशिक‘होप’ वाटणार एक हजार स्टिमर

‘होप’ वाटणार एक हजार स्टिमर

नाशिक । प्रतिनिधी

वाफ घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदतीसह छातीत असलेले कफ कमी करण्यास मदत करणारे वाफेच्या एक हजार मशिनचे (स्टिमर) वाटप होप फाउंडेशनकडून केले जाणार आहे. उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

- Advertisement -

करोना वाढत असून रुग्णालयेही फुल्ल झाले आहेत.यामुळे अनेक रुग्ण होम आयसोलेट होत आहे.मात्र,शहरातील काही गोरगरीब रुग्णांकडे वाफेचे मशिन नसल्याने शहरातील शासकीय रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयांसह गोरगरीबांना वाफेचे मशिन (स्टिमर) वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

यावेळी अध्यक्ष प्रा.नुरे इलाही, सचिव जहीर शेख, मोबीन पठाण, रियाज शेख उपस्थित होते. यावेळी शाह म्हणाले की, वाफ घेण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी, पडसे आदी संसर्ग रोखण्यासाठी काही लोक विक्स किंवा इतर आयुर्वेदिक घटक टाकून वाफ घेतात. त्याच प्रमाणे वाफेने सांधेदुखीवर देखील आराम मिळण्यास मदत होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या