Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३३ बळी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३३ बळी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवसात एकुण 33 मृत्यू करोनाने झाले आहेत. यातील आतापर्यंतचे विक्रमी 26 कोरोनाचे बळी एकट्या ग्रामिण भगाातील आहेत. तर आज दिवसभरात जिल्ह्यात 3 हजार 712 पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले आहेत. गुरूवारी हा आकडा साडेसहा हजार होता. यामुळे आज काहीसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरूवारी हा आकडा अचानक 6 हजार 508 वर पोहचला होता. आज यामध्ये निम्म्याने घट आली आहे. असे असले तरी इतर दिवसांच्या तुलनेत हा आकडाही मोठा आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 22 हजार 6 वर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 39 हजार 866 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील चोवीस तासात 3 हजार 295रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 83 हजार 151 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 712 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 3 हजार 289 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 37 हजार 392 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 941 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 71 हजार 944 झाला आहे. मालेगावात 125 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 601 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 3 हजार 61 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज जिल्ह्यात विक्रमी 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आतापर्यंतचे विक्रमी सर्वाधिक ग्रामिण भागातील 26, नाशिक शहरातील 5, तर जिल्हाबाह्य 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 620 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 3 हजार 631 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 3 हजार 210 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 369 तर मालेगाव येथील 52 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,22,006

* नाशिक : 1,37,392

* मालेगाव : 9,609

* उर्वरित जिल्हा : 71,944

* जिल्हा बाह्य ः 3,061

* एकूण मृत्यू: 2,620

* करोनामुक्त : 1,83,151

- Advertisment -

ताज्या बातम्या