Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ३१ बळी

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ३१ बळी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवसात 3 हजार 741 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्या तुलनेत हे साडेपाचशेने कमी असला तरी मृत्युदर चढाच असून सलग तिसर्‍या दिवशी एकुण 31 मृत्यू करोनाने झाले आहेत. यामध्ये ग्रामिण भागातील तब्बल 21 मृत्यू आहेत तर आज रोजी जिल्हाभरातील विविध रूग्णालयात 41 हजार 565 करोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी हा आकडा 4 हजार 294 वर पोहचला होता. आज यामध्ये घट आली आहे. असे असले तरी इतर दिवसांच्या तुलनेत हा आकडाही मोठा आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 30 हजार 41 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 3 हजार 797 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 90 हजार 339 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 741 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 846 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 41 हजार 325 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 791 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 75 हजार 763 झाला आहे. मालेगावात 28 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 714 झाला आहेे. जिल्हा बाह्य 76 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 239 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज सलग ि तसर्‍या दिवशी जिल्ह्यात विक्रमी 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 21, नाशिक शहरातील 9 रूग्ण आहेत, तर जिल्हाबाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 682 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 545 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 152 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 292 तर मालेगाव येथील 63 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,30,041

* नाशिक : 1,41,325

* मालेगाव : 9,714

* उर्वरित जिल्हा : 75,763

* जिल्हा बाह्य ः 3,239

* एकूण मृत्यू: 2,682

* करोनामुक्त : 1,90,339

- Advertisment -

ताज्या बातम्या