Friday, May 3, 2024
Homeराजकीयमाजी गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी धाड; एफआयआरचा अतिरेक

माजी गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी धाड; एफआयआरचा अतिरेक

मुंबई । प्रतिनिधी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने धाड टाकणे, एफआयआर दाखल करणे वगैरे अतिरेक असून हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

लाचखोरीच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधातील प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर शनिवारी त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली. तसेच देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज ट्विट करत सीबीआयच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सांगितले असताना अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या