Sunday, May 5, 2024
Homeनगरभेंड्यातील कृषी पदवीधर तरुणांने केला प्लाझ्मा दान

भेंड्यातील कृषी पदवीधर तरुणांने केला प्लाझ्मा दान

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील मंगेश गोरक्षनाथ नवले (वय 31 वर्षे) या कृषी पदवीधर तरुणांने आज स्वतः प्लाझ्मा दान करून एका रुग्णाला जीवदान दिल्याने मंगेशच्या हिमतीचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कृषी पदवीधर मंगेश नवले यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. त्यातून ते पूर्ण बरे होऊन आपल्या कार्यबाहुल्यात मग्न आहेत.

याबद्दल माहिती देतांना मंगेश म्हणतो की,गेल्या आठवड्यात विचार आला, या कोरोनाच्या वाईट काळात समाजासाठी आपण काय करू शकतो आणि पोस्ट केली प्लाझ्मा पाहिजे असेल तर कळवा. काल आई दिना निमित्त अचानक फोन आला,मित्राचे वडील सिरीयस आहेत. स्कोर २३ आहे, डॉक्टरने प्लाझ्मा ट्रीटमेंट शेवटचा पर्याय सांगितला आहे. एवढा फोन ऐकला आणि कुणासाठी लागतो? कुठे लागतो? हे न विचारता लगेच तयारी दर्शवली. सदरील व्यक्ती मला जनकल्याण रक्तपेठी नगरला घेऊन आली. त्यांनी सोबत चार डोनर आणले होते.त्यातील फक्त माझा सॅम्पल व्यवस्थित आल्याने मला प्लाझ्मा डोनेशनची संधी मिळाली.

मित्रानो सध्याच्या परिस्थितीत फार गरज आहे प्लाझ्माची,रक्ताची यांच्यातून कुणाला तरी कुणाचे आई वडील, मुलगा ,मुलगी पुन्हा मिळणार आहेत.कुणाचे तरी मुलगा मुलगी आपल्या आईची वडिलांची घरी येणाची वाट पाहत आहेत. मंगेश म्हणतो,समाजाची परिस्थिती समजून घ्या आणि स्वयमस्फुर्ती ने प्लाझ्मादानासाठी पुढे या.पेंशटचे नातेवाईक लॅबच्या बाहेर डोनर मिळत नसल्याने रडताना मी माझ्या डोळ्यांनी आज पाहिलेत.

फार वाईट आणि विदारक परिस्थिती आहे.कोरोना झाल्यावर आपण ४० दिवसानंतर कधीही प्लाझ्मा देऊ शकतो आणि एकदा दिल्यावर पुन्हा १५ दिवसांनी देऊ शकतो काहीही त्रास होत नाही.आयुष्यच समाधान काय असत त्याचा अनुभव आज आला एखाद्याचा जीव वाचण्यासाठी माझ्या हातून झालेला छोटासा प्रयत्न म्हणजेच खऱ्या आयुष्यच सुख आहे. प्लाझ्मा दानाची ही संधी दिल्याबद्दल मंगेशने डॉ.अरविंद पोटफोडे, महेश नवले, पत्नी सौ. सरला नवले, सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, अभिजित नवले यांना दिले आहे. इतरांनीही मंगेश पासून प्रेरणा घेऊन प्लाझ्मा दाना साठी पुढे आले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या