Thursday, May 2, 2024
Homeनगरपिंप्री-लौकी अजमपूरच्या 24 जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

पिंप्री-लौकी अजमपूरच्या 24 जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथे धान्याचे पोते ढकलुन दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व अपमान करुन थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात 24 जणांविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत भाऊसाहेब सखाराम सातपुते यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घरासमोर मोठ्याभाऊ गणपत लावरे याने सुमारे एक वर्षापुर्वी पत्र्याचे शेड बांधले होते. दि. 14 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास या शेडला मोठ्याभाऊ लावरे व त्याचे नातेवाईक असलेले भास्कर लावरे, गणेश लावरे, किरण लावरे, राजु लावरे, नामदेव लावरे, संपत लावरे, शंकर लावरे, भिमा लावरे, सोपान लावरे, भागवत लावरे, प्रदिप लावरे, विठ्ठल लावरे, बबन लावरे, दिलीप लावरे, जालिंदर लावरे, मनोहर लावरे, साहेबराव लावरे, संपत लावरे, दामु लावरे, लहानु लावरे, पाराजी लावरे, भिमा लावरे, बाबुराव लावरे हे शेडला चारही बाजुने जाळी लावत होते.

यावेळी त्यांनी आमच्या घरासमोरील धान्याचे पोते ढकलुन दिल्यामुळे धान्याची गोणी फुटल्याने माझ्या पत्नीने त्यांना विचारणा केली असता या सर्वांनी ही जागा तुमच्या बापाची आहे का? तुमचं एकच घर आहे, तुम्हाला केव्हाही येवुन मारुन टाकु असे म्हणून पत्नीला मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे व भागवत लावरे या तिघांनी ढकलुन दिले. त्यामुळे ती घरासमोरील लोखंडी पलंगावर पडली व तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आहेत. यानंतर मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे, भागवत लावरे व नामदेव लावरे या चौघांनी माझ्या पत्नीला जातीवाचक बोलुन तिचा अपमान केला व यांना फाशी देवुन मारु असे म्हणत माझ्या सुनाना शिवीगाळ केली. तसेच माझा मुलगा प्रदिप याची सायकल ही ढकलुन दिली. याप्रसंगी विजय कदम, भास्कर गिते, योसेफ कदम, कारभारी दातीर, संजय लावरे हे उपस्थित असल्याने त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शेडची जाळी लावण्यात आली व जाळी काढून घेण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्यांनी जाळी काढली नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2021 भारतीय दंड संहिता 143, 147, 149, 323, 504, 506, 34 व अनुसूचित जाती जमाती 3(1) (आर)(एस) नुसार भास्कर शंकर लावरे, गणेश शंकर लावरे, किरण बाबुराव लावरे, राजु बाबुराव लावरे, नामदेव दादा लावरे, संपत नामदेव लावरे, शंकर दादा लावरे, भिमा दादा लावरे, सोपान नामदेव लावरे, भागवत गंगा लावरे, प्रदिप भागवत लावरे, विठ्ठल गणपत लायरे, बबन गणपत लावरे, दिलीप बबन लावरे, जालिंदर बबन लावरे, मनोहर मोठ्याभाऊ लावरे, साहेबराव बादशहा लावरे, संपत साहेबराव लावरे, दामु दादा लापरे, लहानु बादशहा लावरे, 21) पाराजी बादशहा लावरे, भिमा दादा लावरे, बाबुराव बादशहा लावरे, मोठ्याभाऊ गणपत लावरे (सर्व रा. पिप्री – लौकी अजमपूर, ता. संगमनेर) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या