Sunday, May 5, 2024
Homeधुळेदोन महिन्यात रोखले 20 बालविवाह

दोन महिन्यात रोखले 20 बालविवाह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात 20 बालविवाह रोखण्यात आले. पोलिस पाटील व बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळेच हे विवाह रोखले गेले. दरम्यान याबद्दल कुळथेतील पोलिस पाटालांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

शहरातील साक्री रोडवरील मुलांच्या बालगृहात आज महाराष्ट्र शासन राज्यपाल गठीत बालकल्याण समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाने हे होते.

तर बालकल्याण समिती सदस्य प्रा. वैशाली पाटील, अ‍ॅड. मंगला चौधरी हे उपस्थित होते. यावेळी कुळथे गावाचे पोलीस पाटील यशवंत गायकवाड यांचा चांगल्या कामाबद्दल कौतुक म्हणून पत्रक व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

बालविवाह झाला तर पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.असे बालकल्याण समितीने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील 20 बालविवाह थांबविण्यात बालकल्याण समितीला यश आले. काल दि. 20 मे रोजी कुळथे गावातील पोलीस पाटील यशवंत चुडामन गायकवाड यांनी आपली कर्तव्यदक्ष भुमिका लक्षात ठेवून त्यांनी कुळथे येथे होणारे दोन बालविवाह थांबवले.

संबंधीत कुटुंबियांना बालकल्याण समिती समोर हजर होण्यास विनंती केली. ते कुटुंब बालकल्याण समिती समोर आज हजर राहिले. प्रा. वैशाली पाटील या सतत मुलीचे कौन्सिंलीग करतात. त्यावेळी लक्षात आले की, यातील 98 टक्के मुलींना लग्नाचा अर्थ सुद्धा कळत नव्हता. नंतर रडुन रडुन सांगतात मँम मला जायच नाही सासरी, मी शिकसु…आई बाप ले समजवा. हे सार मन हेलावून टाकणार्‍या घटना असतात.

या कामात महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच बालसंरक्षण कक्षाच्या तुप्ती पाटील व सोशल वर्कर योगेश धनगर यांनीही वेळेची पर्वा न करता विवाह आदल्या दिवशी जावुन थांबवला. तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील व हवालदार ठाकुर यांचे सहकार्य लाभले. प्रसंगी बालगृहाच्या अधिक्षीका अर्चना पाटील, डाटा ऑपरेटर अश्विनी देसले आदी उपस्थित होते. चाईल्ड लाईन, बालसंरक्षण कक्ष व इतर अनेक जागृत नागरिकांचे सहकार्य लाभते.

- Advertisment -

ताज्या बातम्या