Thursday, May 2, 2024
Homeनगरसंगमनेरमध्ये वाढले चोरट्यांचे धाडस; शहर पोलिस वसाहतीच्या रूममधून दोन दुचाकी चोरीला

संगमनेरमध्ये वाढले चोरट्यांचे धाडस; शहर पोलिस वसाहतीच्या रूममधून दोन दुचाकी चोरीला

संगमनेर | तालुका प्रतिनिधी

संगमनेर शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असुन चोरी गेलेल्या मोटर सायकल व चोरांचा अजूनपर्यंत तपास लागलेला नसून तेच आता तर चोरट्यांनी थेट गजबजलेल्या पोलिस वसाहतील असलेल्या रूममधूनच चक्क दोन दुचाकी चोरून पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना गुरुवार ( ता.२२) जून रोजी दुपारी घडली आहे.

- Advertisement -

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पोलिस वसाहतीच्या रूममध्ये बुलेट क्रमांक( एमएच २० ए.९४२३, (एमएच १७ सीए.९८६०) या दोन दुचाकी लावल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी शासकीय रखवालीतून या दोन्ही दुचाकी चोरून पसार झाले आहे. याप्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाले हे करत आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहरातील विविध भागात मोठ्याप्रमाणात दुचाकीच्या दररोज चोऱ्या होत आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.आता तर चोरट्यांनी थेट पोलिस वसाहतीच्या रूममधूनच दुचाकी चोरून पोबारा केल्याने आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या