Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारपालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फतही कोंबडया पकडण्याची मोहिम सुरु

पालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फतही कोंबडया पकडण्याची मोहिम सुरु

नवापूर । श.प्र.- Navapur

शहरात पालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फतही कोंबडया पकडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तालुक्यात कोंबड्यांना बर्ड फ्लु झाल्याचे घोषित झाल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी कलिंगचे काम सतत सुरू आहे.

- Advertisement -

शिष पोल्ट्री, परवेज पठाण पोल्ट्री, आमलीवाला पोल्ट्री, पालावाला पोल्ट्री या चार पोल्ट्री फार्ममधहल 84 हजार 787 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचे 91 पथक कोबड्यांचे कलिंग करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करीत आहेत.

सोमवारी सहयोग, शिष, पालावाला व न्यु डायमंड या चार पोल्ट्रीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कलिंगचे काम वाढले आहे. कलिंग करणार्‍या पथकांना दिवसातून दोन वेळा पीपीई किट उपलब्ध करून द्यावी लागते. त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आज पालिकेच्या कर्मचार्‍यांनीही कोंबडया पकडण्याचे काम सुरु केले आहे. शहरातील प्रत्येक भागात जावून कर्मचार्‍यांनी कोंबडया पकडण्याचा प्रयत्न केला. पकडलेल्या कोंबडयांना गोणपाटामध्ये गोळा करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून पुणे येथील पशुसवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, प्रांत अधिकारी वसुमना पंत, तहसिलदार मंदार कुलकर्णी, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस.राऊतमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक नासिर पठाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशीकांत वसावे आदी सर्व अधिकारी परीस्थीवर नजर ठेऊन आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या