Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या शालिमार परिसरात कारला आग

नाशिकच्या शालिमार परिसरात कारला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पहिल्या गेटजवळ शुक्रवारी (दि. १३) दुपारी बारा वाजता एका प्रवासी चारचाकीने अचानक पेट घेतल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असून अग्निशमन दलाने काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.

- Advertisement -

शालिमार सिग्नलजवळ एमएच १५ एफएफ ५७८४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच वाहनाने पेट घेतला. चालक अरुण परदेशी यांच्या लक्षात प्रकार येताच त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बाहेर पडत सुरक्षित अंतर गाठले. चालक बाहेर पडताच काही क्षणांतच वाहनाचा भडका उडाला आणि आगीचे लोट झेपावले.

घटनेच्या वेळी परिसरातून जात असलेल्या अग्निशमन विभागातील कर्मचारी घनश्याम इम्पाल यांनी गांभीर्य ओळखून मुख्यालयाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. लिडींग फायरमन आर. सी. मोरे यांच्या सूचनेने बी. एम. खोडे, आय. एस. शेख, चेतन देलाई, प्रशिक्षणार्थी फायरमन संकेत भवर, युवराज पाटोळे आणि चेतन डेर्ले यांनी पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली.

घटनेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहन पूर्णतः जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ओपन बार’ आणि रात्रीचा गोंधळ; आदेशांची काही...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि बदलती जीवनशैली यासोबतच रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ('ओपन बार') करण्याचे प्रमाण...