Friday, May 3, 2024
Homeजळगावअंगणात दुचाकी उभी करण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण

अंगणात दुचाकी उभी करण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण

जळगाव – jalgaon

तालुक्यातील नशीराबाद (nashirabad) येथे अंगणात दुचाकी उभी करण्यास नकार दिला असता महिलेला तरुणाने अश्‍लिल शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात रुपेश संजय माळी रा. महाजनवाडा, नशीराबाद या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, नशीराबाद येेथील रहिवासी ५२ वर्षीय महिला मंगळवारी घरी होती. यादरम्यान तिने तिच्या अंगणात दुचाकी उभी करण्यास रुपेश संजय माळी या तरुणास नकार दिला. त्यावरुन रुपेश याने महिलेला अश्‍लिल शिवीगाळ करत, चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेने पोलिसात तक्रार देईन असे सांगितले असता रुपेश याने महिलेला तुला मारुन टाकीन, तुझ्या मागे रडणारे कोणीच नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या महिलेच्या तक्रारीवरुन रुपेश संजय माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या