Tuesday, September 15, 2026
Homeजळगावतालुक्यातील एका गावात दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार

तालुक्यातील एका गावात दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार

जळगाव – jalgaon

तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय व ७ वर्षीय अशा दोन बहिणींवर तरुणाने लैगिंग अत्याचार केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २० ऑक्टोंबर रोजी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील एका गावात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवार, २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्य सुमारास गावातच राहणारा तरुण मुलींच्या घरी गेल्या. यादरम्यान त्याने दोघां चिमुकल्या बहिणीसोबत अश्‍लिल चाळे करत दोघांवर लैगिंक अत्याचार केला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन याप्रकरणी अत्याचारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे करीत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत संशयित तरुणास न्यायालयात हजर करण्याची कारवाई सुरु होती.

ताज्या बातम्या

आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजेच….; सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा जोरदार प्रतिवाद

0
मुंबई । Mumbai सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाचे, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला न्यायालयीन संग्राम आता अत्यंत निर्णायक वळणावर आला...