Tuesday, September 15, 2026
Homeक्राईमCrime Story: सोशल मीडियावरील वन क्लिकचं जाळं अन् दोन ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा...

Crime Story: सोशल मीडियावरील वन क्लिकचं जाळं अन् दोन ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी
मोठ्या परताव्याचे आमिष आणि सोशल मीडियावरील वन क्लिक जाळे… फसवणुकीच्या या दोन भिन्न क्लुप्त्यांचा वापर करून चोरट्यांनी जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ४१ लाख १६ हजार रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे.

उपनगर आणि मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात (दि. १३) याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून, वाढत्या डिजिटल व वैयक्तिक फसवणुकीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे प्रत्यक्ष घरी येऊन विश्वास संपादन करत झालेली फसवणूक, तर दुसरीकडे फेसबुकवरील बनावट लिंकद्वारे झालेला सायबर स्ट्राइक, अशा दोन मार्गांनी नागरिकांचे आयुष्यभराचे संचित लुटले जात असल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे.

- Advertisement -

वडाळा शिवारातील युनायटेड कोर्टयार्ड येथील रहिवासी राजश्री विनोद गांगुर्डे (६४) या सेवानिवृत्त वृद्धेला एसबीआय, एनटीपीसी आणि इंडसइंड बँकेच्या बाँड्सम मध्ये सुरक्षित गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. संशयित विजय सुधाकर वाघमारे (रा. मोहीत सोसायटी, त्र्यंबक रोड, सातपूर) याने ऑक्टोबर २०२५ ते जुलै २०२६ या काळात फिर्यादीच्या घरी जाऊन विश्वास संपादन केला. इंडसइंड बँकेत ३१ लाखांची गुंतवणूक केल्याचे बनावट स्टेटमेंट ऑफ अकाउंट दाखवून संशयिताने गांगुर्डे यांचा विश्वास जिंकला.

Nashik News: चक्का नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्स ॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरुन…

प्रत्यक्ष मात्र ३६ लाखांची रक्कम गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केला. मालेगावातील सावता नगर (संगमेश्वर) येथील ६८ वर्षीय केबल ऑपरेटर दिलीप तुकाराम भावसार यांना फेसबुकवरील एका भुलथापाने मोठा आर्थिक फटका बसवला. २४ ऑगस्ट रोजी फेसबुक वापरताना भावसार यांना इंडसइंड बँकेचे बनावट पेज दिसले. त्यावर क्लिक करताच अज्ञाताने (मो. ९४१२१७०५८०) त्यांना कॉल केला. नेटबँकिंग सुरू करण्याचे आमिष दाखवून बँकेची माहिती व खात्यावर आलेले ३ ओटीपी मिळवले. ३ सप्टेंबर रोजी खात्यातून ५ लाख १६ हजार रुपये गायब झाल्याचे भावसार यांच्या निदर्शनास आले. मालेगाव छावणी पोलिसांत ठकबाजी व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : दुपारपर्यंत परवानगी न मिळाल्यास…; अंतरवालीतून निघताना जरांगेंचा...

0
मुंबई । Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज १८ वा दिवस उजाडला आहे. प्रकृती खालावत असली...