इगतपुरी | वार्ताहर | Igatpuri
येथे इगतपुरी नगरपरिषदेच्या (Igatpuri Municipal Council) पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खुन (Murder) झाल्याची घटना घडली आहे. भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच खून केल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन बबन गोईकणे (वय ५०) रा. गिरणारे ता. इगतपुरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज बुधवार (दि.७) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वादात (Dispute) झाल्यामुळे मदन यांचा मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा : बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका; शेकडो ट्रक सीमेवरच अडकले
तर खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच मदन गोईकणे यांचा मृत्यू झाला. तर महेंद्र भरत गोईकणे असे संशयिताचे नाव असून आज सकाळी त्यांचे मदन गोईकणे यांच्यासोबत वाद झाला होता. त्यातूनच त्यांनी हा खून केल्याचे बोलले जात असून या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.
हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये आंदोलकांची धुडगूस, हिंसाचार, जाळपोळ सुरुच; अवामी लीगच्या २० नेत्यांची हत्या
दरम्यान, संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने खून केल्याबाबतची फिर्याद मयताची पत्नी सिंधूबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा