Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News: सातपूरच्या रहिवासी भागात घुसलेला बिबट्या जेरबंद

Nashik News: सातपूरच्या रहिवासी भागात घुसलेला बिबट्या जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सातपूर परिसरातील शिवाजीनगर, तुकाराम गार्डनजवळील विठ्ठल-रुख्मिणी श्रीराम रो-हाऊस परिसरात आज सकाळपासून बिबट्याच्या वावरामुळे एकच खळबळ उडाली होती, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही थरारक घटना दुपारपर्यंत ‘लपाछपी’च्या खेळातच अडकून पडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बांधकाम सुरू असलेल्या रो-हाऊसवर कामगार आपापल्या कामात गुंतले होते. काही जण टाइल्स बसवत होते, तर काही पाणी मारत होते. याचदरम्यान अचानक पाठीवर जखम झालेला बिबट्या त्यांच्या समोर आला. क्षणभर सर्व काही स्तब्ध झाले आणि पुढच्याच क्षणी कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली.

दरम्यान, सुमारे ९ वाजेच्या सुमारास हा बिबट्या रो-हाऊस परिसरात शांतपणे बसलेला दिसून आला. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, परिस्थिती तणावपूर्ण असतानाच बिबट्या अचानक बाहेर पडला आणि नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. भीतीने लोकांनी अक्षरशः पळ काढल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील यांनी तातडीने वनविभाग आणि पोलिसांना पाचारण केले. गंगापूर पोलीस पथक, वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच शोधमोहीम सुरू करण्यात आली.

प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या रो-हाऊसमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, शोधमोहीम सुरू असतानाच तो जवळील गवतामधून बाहेर येताना दिसला. वनविभागाने त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा झुडपांमध्ये पसार झाला.ङ्गपरिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे बिबट्याचा अचूक ठावठिकाणा मिळणे कठीण जात असून, प्रशासनाने ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. जवळपास चार तासांपासून बिबट्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.

दरम्यान, सुरुवातीला बिबट्या ध्रुव नगर परिसरात असल्याची अफवा पसरली होती. मात्र नंतर तो शिवाजीनगरमधील तुकाराम महाराज क्रीडांगण परिसरात, तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर वन खात्याने गूंगीचे इंजेक्टन ‘डार्ट’ ने त्याला बेशूध्द करुन जेरबंद केले.

कुतूहलापोटी बिबट्याला पहैण्यासाठी व रिल काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून आले. संपूर्ण परिसरात असलेला तणाव निवळला असून बिबट्याच्या लपाछपीची चर्चा मात्र परिसरात रंगत आहे.

ताज्या बातम्या

बारामती

Baramati Rahuri Election: बारामती, राहुरीत काँग्रेस उमेदवार उतरवणार; हायकमांडकडून ग्रीन सिग्नल

0
मुंबई | Mumbaiउपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. ही...