Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवनारवाडीत बिबट्या जेरबंद

वनारवाडीत बिबट्या जेरबंद

दिंडोरी । प्रतिनिधी Dinsori

गेल्या काही दिवसांपूर्वी वनारवाडी येथे वन विभागाला दोन दिवसात दोन बिबटे पकडण्यात यश आले होते. काल पुन्हा एकदा वनारवाडी गावात तिसरा बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन नरबळी गेल्याने नागरिकांनी आंदोलन केले होते. याची वन विभागाकडून गांभीर्यान दखल घेऊन घटना घडल्याच्या ठिकाणी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. त्यानंतर 50 दिवसाच्या प्रतीक्षानंतर वन विभागाच्या पिंजर्‍यात पहिला बिबट्या जेरबंद होताच दुसर्‍या दिवशीही दुसरा बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले होते. त्यानंतर काल सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा तिसरा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...