Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षीय बालिकेचा मृत्यू

दुर्दैवी : पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षीय बालिकेचा मृत्यू

​नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकच्या आडगाव परिसरात घरात खेळत असताना बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिंदवी दत्तात्रय भोसले (वय १ वर्ष, रा. भोसले मळा, आडगाव फाटा) असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी(दि. २२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास हिंदवी घरात खेळत होती. खेळता खेळता ती बाथरुममध्ये गेली. तिथे पाण्याने भरलेल्या बादलीत वाकून पाहत असताना तिचा तोल गेला आणि ती बादलीत पडली. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच वडील दत्तात्रय भिका भोसले यांनी तिला उपचारासाठी आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, दुपारी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार पाटील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...